चंद्रपूर शहरात ८ ते १० फूट पाण्याचा वेढा, नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात
1123 views
चंद्रपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करावर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने चंद्रपूर शहराजवळील इरई आणि झरपट नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. शहरातील राजनगर, सहारा पार्क आणि सिस्टर कॉलनी परिसरात इरई नदीचे पाणी शिरले आहे. या भागात असलेल्या घरांना ८ ते १० फूट पाण्याचा वेढा आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने पूरग्रस्त भागातून लोकांना काढण्यास सुरुवात केली आहे.इरई धरणातून पाणी सोडण्याची शक्यता वर्तवली आहे. जिल्हा प्रशासनाची लोकांना राजनगर-सहारा पार्क भागातून रेस्क्यू करण्याला सुरुवात केली आहे.