माझ्याच घरात ही वेळ येईल असं कधीच वाटलं नव्हतं, धानोरकरांच्या आमदार पत्नी भावूक
1259 views
चंद्रपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकरांच्या अकाली निधनाने कुटुंबियांसह, पक्षावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यावेळी, आपल्या पतीबाबत बराच वेळ धीराने बोलणाऱ्या पत्नी आमदार प्रतिभा पवारांच्या अश्रूंचा बांधही फुटला. इतरांच्या शोकसभा घेता घेता माझ्याच घरात ही वेळ येईल असं कधीच वाटलं नव्हतं; असं प्रतिभा पवार म्हणाल्या. तसेच, मृत्यू कुणालाही चुकला नाही, सारे प्रयत्न केले पण शरीराने साथ दिली नाही असं म्हणत प्रतिभा पवार धीराने बोलत होत्या. मात्र, अखेरीस प्रतिभा पवारांनी ठेवलेला धीर सुटला, अश्रूंचा बांध फुटला आणि उपस्थितांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं.