'महाराष्ट्र टाइम्स'च्या बातमीमुळे जीव वाचला, आदेश बांदेकरांनी सांगितली जीवघेणी आठवण
1235 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकोजागरीनिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित केलेल्या 'आदेश भावोजींसह गप्पा' कार्यक्रम पार पडला. या मुलाखतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावत अंबरनाथकरांनी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला. आदेश बांदेकरांचे सूत्रसंचालन, अभिनय, निर्माता, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय नेता असे अनेक पैलू या मुलाखतीत उलगडले. आदेश बांदेकरांनी मनमोकळेपणानं त्यांच्या कारकिर्दीतील कडू-गोड आठवणींचा पट उपस्थित शेकडो रसिकांसमोर मांडला.