मराठी सिनेमा संपतोय आणि संपवला जातोय का? TDM चित्रपटाला थिएटर मिळेना, कलाकारांना अश्रू अनावर
1352 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित टीडीएम हा सिनेमा अलीकडेच २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर म्हणावा तसा फायदा निर्मात्यांना होताना दिसत नाहीये. दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंनी सिनेमाला थिएटर न मिळण्याबाबत खंत व्यक्त केली आहे. १ मे रोजी सिनेमाच्या संपूर्ण टीमनं केलेलं फेसबुक लाइव्ह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि कलाकारांसह सगळ्या टीमनं प्रेक्षकांसमोर आपली खंत व्यक्त केली. प्रेक्षकांसमोर बोलताना कलाकारांना अश्रू अनावर झाले होते.