इंजिनिअरिंग ते एकेकाळचा टेनिस बॉल प्लेअर... मुंबई इंडियन्ससाठी खेळला अन् स्टार बनला
Curated by Shantanu Kulkarni|TimesXP Maharashtra|25 May 2023
एखाद्या गोलंदाजाने २१ चेंडूत १७ डॉट बॉल टाकले आणि केवळ पाच धावा देऊन पाच विकेट घेतल्या, तर मैदानावर किती दहशत आणि टेन्शन असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. आकाश मधवालने हे करुन दाखवलं आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपरजायंट्सचा धुव्वा उडवला केला. मुंबई इंडियन्सच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो वेगवान गोलंदाज आकाश मढवालने. उत्तराखंडच्या रुडकी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय आकाशसाठी हा प्रवास इतका सोपा नव्हता. २५ नोव्हेंबर १९९३ रोजी जन्मलेल्या आकाशचे वडील भारतीय लष्करात कार्यरत आहेत. इंजिनीअरिंग केल्यानंतर आकाशला क्रिकेटर होण्याचा मोह जडला. त्याआधी तो फक्त टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत त्याने लेदर बॉल हातातही घेतला नव्हता. त्याने कधी प्रशिक्षणही घेतलं नाही. मुंबईसाठी निळ्या जर्सीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करणारा आकाश मधवाल उत्तराखंडकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. इतकेच नव्हे तर आकाश उत्तराखंड संघाचा कर्णधारही आहे. तो लिस्ट ए आणि टी-२० मध्ये संघाचे नेतृत्त्व करतो.