ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं वयाच्या ९४ वर्षी निधन; रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
1522 views
मनोरंजन चे व्हिडिओ सबस्क्राईब कराहिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सोज्वळ, निरागस अभिनयातून कोट्यवधी चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 94 वर्षाच्या होत्या. . गेल्या काही महिन्यांपासून सुलोचना श्वसनाशी संबंधित संसर्गानं आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी बेळगावमध्ये चिकोडी तालुक्यातील खडकलरत गावी झाला. हिंदी-मराठी सिनेसृष्टीचा प्रदीर्घ काळ ज्यांनी 'याचि देही..याचि डोळा' जगला अशा फार थोड्या दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत सुलोचना दीदी. त्यांनी 1943 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. भालजी पेंढारकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांच्या विशेषत: ‘आई’च्या भूमिका जास्तच संस्मरणीय ठरल्या.