अरविंद केजरीवालांची अटक त्यांच्याच कर्माची फळं, मी त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे - अण्णा हजारे
1047 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करादिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली. यावर सामाजिक कार्यकर्ते तथा लोकपाल आंदोलनातील केजरीवालांचे सहकारी अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. अण्णा हजारे म्हणाले, मी अरविंद केजरीवालवर प्रचंड नाराज आहे. त्यांनी एकेकाळी माझ्यासोबतच काम केलं. तेव्हा ते दारुच्या विरोधात काम करायचे, पण आता त्यांनी दारुसाठीच धोरणं बनवली. त्यांना झालेली अटक ही कर्माची फळं आहेत. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली.