पुढचे पाच दिवस कीर्तन बंद, इंदुरीकर महाराजांचीही मनोज जरांगेंना भक्कम साथ
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसले. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस. जरांगेंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललीय अन् मराठा आंदोलन पेटत चाललंय. राज्यभरातील विविध घटक जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत. संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात कडकडीत बंद पाळत एकदिवसीय उपोषण सुरु आहे. या उपोषणस्थळी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी भेट दिली. आरक्षण आमच्या हक्काचं म्हणत इंदुरीकर आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनात सहभागी होत इंदुरीकरांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय. एवढंच नव्हे मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा म्हणून सोमवारपासून पुढचे पाच दिवस एकही कार्यक्रम न करण्याचा निर्णय इंदुरीकर महाराजांनी घेतला आहे. किर्तन पाच दिवस बंद ठेऊन जरांगे पाटलांसाठी इंदुरीकर महाराज देखील भक्कम साथ देत मैदानात उतरलेत.