महात्मा फुले कृषि विद्यापीठातील संशोधन प्रकल्पातील शेळीने एकाचवेळी दिला पाच करडूंना जन्म
1206 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासंगमनेरी शेळीने चक्क पाच करडांना जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे अ. भा. समन्वित शेळी सुधार प्रकल्प आहे.या प्रकल्पात संगमनेरी शेळ्यांचे जतन, संवर्धन व गुणवत्ता वाढीसाठी जातिवंत संगमनेरी बोकड, शेळी पालकांना पैदासीसाठी दिले जातात.याअंतर्गत संगमनेर केंद्रातील संगमनेरी शेळयांच्या कळपातील एका शेळीने पाच करडूंना जन्म देण्याचा विक्रम केला आहे.नामशेष होत असलेल्या संगमनेरी जातीच्या शेळ्यांची संख्या 3 हजार वरून 50 हजार पर्यंत नेण्यात यश मिळविले आहे.सदर करडांची शास्त्रोक्त पद्धतीने जोपासना व संगोपन करण्यासंबधीचे मार्गदर्शन संगमनेर केंद्रात केली जात आहे.