नटून थटून नवरदेव आला अन् बोहल्यावर चढण्याअगोदरच जेलमध्ये गेला, प्रेयसीमुळे पोलखोल
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
त्याचं झालं असं की अहमदनगरच्या राहाता येथील एका मुलीचा विवाह नाशिक शहरात राहणाऱ्या पंकज नावाच्या मुलाशी ठरला होता. दोन्ही बाजूकडील नातेवाई आणि मित्र परिवाराचा उत्साह शिगेला होता.. नवरदेव पंकज वाजतगाजत विवाहस्थळी पोहचला मात्र तो बोहल्यावर चढण्याअगोदरच त्याची प्रेयसी पोलिसांसह विवाहस्थळी पोहचली.. पंकजनं लग्नाचे आमिष दाखवून चार वर्ष वारंवार शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याचा तरुणीनं आरोप केले. तरुणीनं केलेले आरोप ऐकून नवरीसह तीच्या घरच्यांचा पारा चांगलाच चढला आणि नवरीने तात्काळ विवाहास नकार देत हा विवाह रद्द केला. पोलिसांनी पंकजला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तरुणीशी संबंध असल्याची कबुली दिली. तक्रारीपूर्वी कलवरे, कलवऱ्या यांच्या गराड्यात असणारा नवरदेव काहीवेळातच पोलीस स्टेशनला पोहचला. पिडीतेच्या फिर्यादीवरून पंकजवर कलम ३७६ आणि ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय..