आम्ही कोणाला स्पर्धक समजतच नाय, रोज काम करतो, नुसती पोपटपंची नाय; दणदणीत विजयानंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता आली. निलेश लंके, माजी आमदार विजयराव औटी एकत्र आल्यानं इथं १८ पैकी १८ जागांवर यश मिळालं. ही निवडणुकीत आमदार निलेश लंके विरुद्ध खासदार सुजय विखे अशी पाहिली जात होती. ज्यात लंकेंनी बाजी तर मारलीच पण त्याचसोबत विरोधकांना सुनावलं देखील आहे. विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना निलेश लंके म्हणाले, इथं कुणीच आमचा स्पर्धक नाय. आम्ही कोणाला स्पर्धक समजतच नाय, रोज काम करतो, नुसती पोपटपंची नाय; असं लंकेंनी सुनावलं.