दुसरे निलेश लंकेही अहमदनगरमधून निवडणूक लढणार, शरद पवार गटाचा विखेंवर निशाणा
1087 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअहमदनगरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत निलेश लंके नावाच्या दोन उमेदवारांनी अर्ज भरला.उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.महाविकासआघाडीचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीने अर्ज भरला.महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय.डमी राजकारण करण्याची विखेंची परंपरा असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली.