Ahmednagar Sanjay Raut : दाऊद, छोटा शकीलला शिवसेनेने पळवून लावले, तेथे तुम्ही कोण? राऊत कडाडले
1078 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करानगरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यानिमित्त खासदार संजय राऊत नगरला आले होते. मुंबईत दाऊद, छोटा शकील, अबू सालेम, टायगर मेमन ही मंडळी खंडणी, जमीन बळकवणे व दहशत करत होते. परंतु शिवसेना त्यांच्या विरोधात उभी राहिली, असं यावेळी राऊत म्हणाले. तुम्ही गुंड तर आम्हीही महागुंड असं म्हणत त्यांना रस्त्यावर उतरून विरोध केल्याने ते पळून गेले. अशाच पद्धतीने आता नगरमध्येही गुंडगिरी व ताबेमारीविरुद्ध शिवसेना उभी राहणार आहे. नगरची अवस्था बिहारचा छोटा भाग झाल्याचे दिसत आहे. माझ्याकडे नगरच्या आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरी विरोधात तक्रारींच्या अनेक फाइल्स आल्या आहेत. राज्यात नवे सरकार आल्यापासून त्यांचे गुंडाराज वाढलेत असा शब्दांत संजय राऊत यांनी नगरचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता निशाणा साधला. त्यांच्या घरावर व जिल्हा प्रशासनावर माझ्या नेतृत्वाखाली मविआ मोर्चा काढणार आहे, असंही ते म्हणाले.