आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबाग फुलवली, कलिंगडाला थेट पश्चिम बंगालमधून मागणी
1028 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील शंकर निकम या तरुण शेतकऱ्याने खळगट नापीक जमिनीवर फळबाग फुलवली.आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याचे व औषध फवारणीचे योग्य नियोजन शंकर यांनी केलं.शंकर यांनी ३० गुंठयात कलिंगड पिकवत लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. प्रती रोप दोन रुपये साठ पैसे या प्रमाणे एकूण पाच हजार चारशे रोपांची लागवड केली. ठिबक सिंचनचा वापर करुन कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल याचा विचार करून या युवा शेतकऱ्याने कलिंगडाला पाणी दिले.जवळपास २ महिन्यांनी हे कलिंगड तोडण्यास आले.सर्व साधारणपणे एक कलिंगड पाच ते सहा किलो वजनाचे आढळून आले. बाजारात प्रती किलो साडे बारा किलो भाव मिळाला. एकूण २३ टन कलिंगडाचे दोन लाख बहात्तर हजार रुपये मिळाले.खर्च जाता एक लाख ऐंशी हजार रुपये एवढा नफा मिळाला. कलिंगड उच्च दर्जाचे असल्याने या कलिंगडास पश्चिम बंगालमधील मालदा मार्केटने मागणी केली आहे. आता महाराष्ट्राचे कलिंगड थेट पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहे.