तुम्ही गरिबांच्या अन्नधान्यात पैसे खाता? विवेक कोल्हे भर बैठकीत तहसीलदारावर संतापले
1128 views
अहमदनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकोपरगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना,रेशन कार्ड,घरकुल योजना,सततच्या पावसाचे अनुदान, विविध विकासात्मक योजना या केवळ लाभार्थी समितीची बैठक गेले ६ महिन्यांपासून झाली नसल्याने हजारो नागरिकांचे प्रकरणे प्रलंबित राहून कोट्यावधी रुपये मिळण्याच्या लाभापासून वंचित राहिले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गरजूंपर्यंत लाभ पोहचत नसल्याने कोल्हे कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कोपरगाव तहसील कार्यालय गाठून अपर तहसीलदार विकास गंबरे यांची भेट घेतली. यावेळी विविध गावातून आलेल्या नागरिकांनी आपल्या विविध तक्रारी मांडल्या. मात्र विवेक कोल्हे नागरिकांच्या समस्या मांडत असताना तहसीलदार गंबरे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत कुजबूज करत असल्याने विवेक कोल्हे भर बैठकीत तहसीलदारांवर चांगलेच संतापले तसेच पुरवठा अधिकाऱ्यालाही झापलं.