वैजापूर पाठोपाठ अकोल्यातही अमित शहांच्या स्वागताचे बॅनर फाडले
1036 views
अकोला चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअमित शहा लोकसभा मतदारसंघाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अकोल्यात येणार आहेत.अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी लावलेले बॅनर्स फाडण्यात आले.बाळापूर रोडवरच्या तुषार सेलिब्रेशन हॉलसमोर आणि रिधोरा गावाजवळ अमित शहांच्या स्वागताचा बॅनर फाडण्यात आले.बॅनर नेमके कुणी फाडले याबाबत अद्यापतरी कळलेलं नाही.अमित शहांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.