चाॅकलेटच्या रॅपरमधून भांगची विक्री; शाळकरी मुलांना जडलं व्यसन? अकोल्यात धक्कादायक प्रकार
1062 views
अकोला चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअकोल्यात भांग विक्रीचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून चक्क चॉकलेटच्या रॅपरमध्ये ही भांगची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. समाजसेवक विनय सरनाईकांच्या निदर्शनास हा प्रकार समोर आला आहे. सरनाईक हे न्यायालयीन कामानिमित्त जात असताना लहान शाळकरी मुलांच्या हातात हे चॉकलेट दिसले, ते वेगळं असल्याने सरनाईकांनी चॉकलेटची तपासणी केली असता चक्क शाळकरी मुलांच्या हातात चॉकलेट रॅपरमध्ये असलेली भांग दिसून आली. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून याकडे संबंधित विभागात तसेच पोलीस प्रशासन लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी ही केली आहे.