पांढरा शर्ट, लांब केस अन् गळ्यात गमछा, पत्र्याच्या घरात राहणारे आणि जरांगेंसारखे हुबेहुब दिसणारे गुजर
1217 views
अकोला चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनोज जरांगे पाटील.... मराठा आरक्षणाचा लढा ज्यांनी उभा केला त्यांचं नावं सध्या राज्यासह देशभरात चर्चेत आहे. जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावाच्या मनोज जरांगे पाटील यांना मराठा योद्धाही म्हटलं जातं. अशातच चर्चा सुरु झाली आहे ती आणखी एका मनोज जरांगे पाटलांची.... होय. मनोज जरांगे पाटील यांच्यासारखाच हुबेहुबे दिसणारा हा व्यक्ती मराठा मोर्चाच्या सभेत सहभागी झाला आणि सगळेच जण चक्रावून गेले... नागरिकांनी त्यांना पाहताच त्यांच्या सोबत फोटो काढणं, त्यांच्यावर फुलं उधळणं सुरु केलं... जरांगे पाटलांसारखे हुबेहुब दिसणारा हा व्यक्ती नेमका कोण आहे? ते मराठा मोर्चाच्या सभेत कसे सहभागी झाले? तेच या व्हिडिओत पाहू....