हेकेखोर म्हणत प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर घणाघात, पत्नीवरूनही साधला निशाणा
1069 views
अकोला चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअकोल्यातील पारस येथे झालेल्या कुणबी समाज संवाद मेळाव्यात बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदींनी एका दिवसासाठी तरी आपल्या बायकोला पंतप्रधान निवासस्थानी घेऊन जावं, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी मोदींना लगावला आहे. जो व्यक्ती कुटुंबासोबत असं वागतो तो किती हेकेखोर असेल?, असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी केला. तसेच, मोदींनी राममंदिर लोकार्पणावेळी शंकराचार्या़सोबत केलेल्या वागणुकीवर आंबेडकरांनी टीका केली.