आम्हाले मोदींसारखं फकीर व्हायचं, बुरे दिन वापस द्या; कराळे मास्तरांचं भाषण, ठाकरे-पवारांची एन्ट्री
अमरावती चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभेचे अधिकृत उमेदवार बळवंत बसवंत वानखडेंच्या प्रचारार्थ आज (२२ एप्रिल) शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा सुरु आहे. यावेळी, नितेश कराळे मास्तरांचं भाषण सुरु असतानाच उद्धव ठाकरे अन् शरद पवारांची एन्ट्री झाली अन् संपूर्ण सभेचा माहोलच बदलला आहे. आम्हाले मोदींसारखं फकीर व्हायचं, बुरे दिन वापस द्या रे, अग्निवीरमधून लग्न करायच्या वेळेत मोदी तरुणांना बेरोजगार करणार, असं म्हणत कराळे मास्तरांनी मोदींवर जोरदार घणाघात केला. तितक्यातच उद्धव ठाकरे, शरद पवारांची एन्ट्री झाली अन् सभागृहात एकच उत्साह संचारला.