अमरावतीत वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. दरम्यान वरुड तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने नद्या-ओढ्यांना पूर आला. खडका गावातून वाहणाऱ्या कुंड नदीला महापूर आला.महापूरामुळे तब्बल दोन तास गावाचा महामार्गाशी संपर्क तुटला.महापुरामुळे कुंड नदीचं रौद्र रूप पाहायला मिळतंय.