उभ्या ट्रकला धडकून काँग्रेस आमदाराच्या गाडीला अपघात, एका मजुराचा मृत्यू; व्हिडिओ समोर
1100 views
अमरावती चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीला अपघात झाला.या अपघाताच्या वेळी बळवंत वानखडे हे त्यांच्या गाडी ऐवजी यशोमती ठाकूर यांच्या गाडीतून प्रवास करत होते.त्यामुळे या अपघातातून ते सुखरूप बचावले आहे.मात्र, आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीचा आणि शेतातून परत येणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाला.या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला आहे.तर दोन मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.जखमींना तातडीने दर्यापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.ट्रॅक्टर रोडच्या मधोमध उभा होता त्याला लाईट नसल्यामुळे गाडी ट्रॅक्टरला धडकल्याची... माहिती आमदार बळवंत वानखडे यांनी दिली आहे.