BJP ने Bachchu Kadu यांचा कार्यक्रम उधळून लावला, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचा राडा
1045 views
अमरावती चे व्हिडिओ सबस्क्राईब कराप्रहारचे आमदार बच्चू कडू आणि सरकार मधला संघर्ष सातत्याने समोर येत आहे.अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील एका गावात आमदार बच्चू कडू यांचा आज कार्यक्रम होता.चांदूरबाजार येथे कामगार कल्याण विभागाच्या वतीने वाटण्यात येणाऱ्या भांडी आणि...इतर गृह उपयोगी व सेफ्टी किटचे वितरण आज होणार बच्चू कडूंच्या उपस्थितीत होणार होते.मात्र त्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्क आमदार बच्चू कडू यांचा कार्यक्रम उधळून लावला.बच्चू कडू कार्यक्रम स्थळी पोहोचण्याआधीच भाजपने त्यांचे बॅनर फाडले, एन्ट्री गेट तोडलं.मतदार संघातील अनेक नागरिक सकाळपासून आपला रोजगार बुडवत रांगेत उभे होते.मात्र दुपारी तीन वाजल्यानंतर सुद्धा बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी किटचे वितरण केले नाही.दरम्यान लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी गोंधळ सुरू केला.काही क्षणातच या बच्चू कडू आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.