पुरातन महालक्ष्मी मंदिरात घाणीचं साम्राज्य; विटंबना थांबली नाही तर खळखट्याक, मनसेचा इशारा
बीडमध्ये एका ऐतिहासिक, पुरातन मंदिराची विटंबना होत असल्याने मनसे आक्रमक झाली आहे. मंदिराची विटंबना थांबवा अन्यथा आमच्या स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा प्रशासनाला दिला. शहरातील किल्ले गेट मिलिया आर्ट सायन्स कॉलेजच्या बाजूला पुरातन मंदिर असून जुन्या जाणकारांचा मते हे महालक्ष्मीचं पुरातन मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी शिल्पकलेचा नमुना आहे, परंतु सध्या इथे निव्वळ घाणीचं साम्राज्य दिसून येतं. याच पार्श्वभूमीवर, मनसे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरेंनी शासन प्रशासनाला इशारा दिला आहे. मंदिराला विटंबनेच्या विळख्यातून मुक्त करा, अन्यथा मोठं आंदोलन उभं करू, असं इशारा दिला. मनसेच्या स्टाईलने या मंदिराचा जीर्णोद्धार कसा करायचा ते आम्हाला माहित असल्याचंही सांगितलं
Curated by Mayuri Sarjerao|TimesXP Maharashtra|20 Apr 2023