छगन भुजबळांचं भाषण लांबलं, बीडकरांचा संयम सुटला; गोंधळामुळे भाषण गुंडाळण्याची वेळ
2940 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउपमुख्यमंत्री अजित पवारांची बहुप्रतिक्षित अशी सभा आज (२७ ऑगस्ट) बीडमध्ये झाली आहे. यावेळी, मंत्री छगन भुजबळांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करणार होते. मात्र, किस्से सांगता सांगता भुजबळांचं भाषण लांबलं आणि बीडकरांचा संयम सुटला. लोकांमधून मोठा गोंधळ ऐकू येताच, मी २ मिनिटांत संपवतो, असं छगन भुजबळ म्हणाले.