राज्याचं सरकार आज गोपीनाथ गडावर; पंकजा मुंडेंकडून मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हार घालून स्वागत
1039 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आज बीडमधील परळीत आयोजन करण्यात आले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले.परळी येथे होणाऱ्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी तिन्ही मंत्री नांदेड विमानतळावर आले होते.विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे हे मुंबई हुन विमानाने एकत्र नांदेडला आले.त्यानंतर गोपीनाथ गडावर पोहोचत त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतलं.यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यादेखील उपस्थित होत्या.गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळाकडे जात असताना...त्यांच्या गाडीचं सारथ्य कृषिमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी केलं.