कृषीमंत्री धनंजय मुंडेंकडून घोषणा, ३५ लाख शेतकऱ्यांची दिवाळी गोड
1166 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराज्यातील जवळपास सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी खुशखबर दिली आहे.राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे.याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.या विमा रक्कमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे.बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.