सुषमा अंधारेंना चापट मारली', ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा दावा; व्हिडीओ व्हायरल
1492 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहाप्रबोधन यात्रेच्या समारोप स्थळी शिवसैनिक आपसातच भिडल्याची घटना घडल्याचं म्हटलं जातं आहेत. उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात मारामारी झाल्याचं म्हटलं जात आहे . सुषमा अंधारे पदांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला होता. पैशांच्या मागणीमुळे झालेल्या वादात अंधारेंना चापटी मारल्याचा दावा करत अप्पासाहेब जाधवांनी केला. अप्पासाहेब जाधवांनी फेसबुक लाइव्ह करत हा दावा केला आहे .अप्पासाहेब जाधवांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे . सुषमा अंधारे या पदांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे.