पंकजाताईंच्या बोटाला इजा, बहीण प्रीतम मुंडे पुढे सरसावल्या; हृदयाला स्पर्श करणारा क्षण
1083 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करालोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना नेत्यांची आपापल्या मतदारसंघात पळापळ पाहिला मिळते. त्यात बीड लोकसभा मतदारसंघातही मुंडे भगिणी जोरदार सक्रिय झालेल्या पाहायला मिळतायंत... अशातच मुंडे भगिणींचा हृदयाला स्पर्श करणारा एक राजकीय व्यासपीठावर पाहायला मिळाला... ज्यामुळे त्यांच्याकडे सगळेच जण पाहत राहिले.... सध्या पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत... मतदार संघ आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांच्या भेटीगाठी आणि सभा होतायतं.... मात्र या वेळेतच पंकजा मुंडे यांच्या बोटाला इजा झाली... ते दिसताच छोटी बहिणी प्रीतम मुंडे पुढे सरसावली आणि तिचं पंकजा ताईंबद्दलचं असलेलं प्रेम सर्वांनाच पाहायला मिळालं. बोटाला इजा झालेली पाहून प्रीतम मुंडे यांनी तात्काळ बँडेज आणून त्यांच्या बोटाला लावतानाचा हा प्रसंग कार्यकर्ते आणि जनता पाहतच राहिली... कारण राजकारणात कितीही धुरंदर असल्या तरी दोन बहिणींचा एकमेकांवर कसं प्रेम आहे हे दर्शवणारा हा प्रसंग खरंच हृदयाला स्पर्श करणार ठरला.....