२८८ कोटी खर्चून दिंडी मार्ग केला, निकृष्ट कामामुळे रस्त्यावरील भेगा ठरतायत मृत्यूचा सापळा
1028 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराहा रस्ता आहे की वाहनचालकांसाठीचा मृत्यूचा सापळा हा प्रश्न पडलाय. शेगाव ते पंढरपूर ही राज्यातील दोन मोठी देवस्थाने जोडण्यासाठी दिंडी महामार्ग खामगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६८ सी हा बांधण्यात आला.बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातुन जाणारा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा मार्फत बांधण्यात आलाय. माजलगाव ते केज ६० किलोमीटर रस्त्यासाठी २८८ कोटी रुपये खर्च केले. मात्र या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्याला भेगा पडल्यायत आणि या भेगा अपघाताचं कारण ठरताना दिसतायत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. माजलगाव ते तेलगाव दरम्यान अत्यंत निकृष्ट कामामुळे रसत्यावर मोठमोठ्या भेगा पडल्याने दुचाकी वाहनांची चाके अडकुन अपघातांचे प्रमाण वाढलंय.