बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत; महिलांनी भाऊबीजेनिमित्त औक्षण करत दिला पाठीशी असल्याचा विश्वास
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज (१५ नोव्हेंबर) दुपारी बीडमध्ये दाखल झाले. यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येत महाराजांना अभिवादन करत जरांगे पाटलांनी..पुढील प्रवासाला सुरुवात केली आहे. मात्र, त्याआधी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील भेट दिली आहे. यावेळी, महिलांनी मनोज जरांगे पाटलांचं औक्षण करत भाऊबीज साजरी केली. हातात हात घेत, पाठिशी असल्याचं वचन देत महिलांनी जरांगे पाटलांसह आपली भाऊबीज साजरी केली. आम्हाला तुमची गरज असल्याचं देखील या महिला मनोज जरांगे पाटलांना म्हणाल्या.