जरांगे पाटलांना काही झाल्यास आम्ही सरकारला पायउतार होण्यास भाग पाडू, बीडमधील रणरागिनी आक्रमक!
1200 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणचा आज आठवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.अशातच बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजातील भगिनींनी एकदिवसीय उपोषण केले.मराठा समाज सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या आणि विषय संपवा अशी मागणी करत आंदोलन केले.यावेळी जरांगे पाटलांची तब्येत खालावत असताना बीड येथील भगिनींच्या डोळ्यात अश्रू तरळले.जरांगे पाटलांना काही झाल्यास आम्ही सरकारला पायउतार होण्यास भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला.बीड येथील आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहित दिक्षित यांनी....