१५ वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचा बनाव रचला, रागाच्या भरात ओढणीने मृतदेह झाडाला टांगला!
2386 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा१५ वर्षीय मुलगा शेतातून गेल्याने पहिल्यांदा वाद झाला..मग वादाचं रुपांतर मारहाणीत झालं.दुसऱ्यांदा मुलगा शेतातून गेला अन् त्याचा शेवट मृत्यूनेच झाला.ही धक्कादायक घटना आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नेत्रुड येथील. माझ्या शेतातून कशाला जातोस म्हणत छोट्या वादाचं रुपातंर भांडणात झालं, वाद विकोपाला गेला अन् इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी गुलाम मोहम्मद मुर्तजा शेख जगाचा निरोप देऊन निघून गेला.थोड्याच वेळात त्या भावडांनी आपल्या भावडांसोबत झालेला सगळा प्रकार खडानखडा आई-वडिलांना सांगितला. गुलामचे वडील मूर्तजा शेख यांनी नातेवाईकांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. पण तोपर्यंत सगळं काही संपलं होतं.