तेव्हा बाबांनी आईला स्टेजवर आणलं आणि सगळ्यांना सांगून टाकलं; पंकजा मुंडेंनी सांगितला भन्नाट किस्सा
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
बीड मधील परळी येथे २५ फेब्रुवारीला राज्यस्तरीय ब्राम्हण ऐक्य परिषद पार पडली.या राज्यस्तरीय ब्राम्हण ऐक्य परिषदेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाषण केलं.यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी आई-बाबांच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे.त्या म्हणाल्या, माझ्या बाबांनी त्या काळात आंतरजातीय विवाह केला, धैर्य दाखवलं.विरोधकांनी असा प्रचार केला की, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे अफवा पसरवतायंत.कारण त्यांना मतं हवी आहेत, तेव्हा बाबांनी स्टेजवर आईला बोलावलं आणि सांगितलं.तेव्हा बाबांनी सांगितलं ही माझी वाग्दत्ता वधू आहे, माझा हिच्यासोबत विवाह होणार आहे.हे सत्य आहे, यात राजकारणाचा काहीही संबंध नाही, हे आपण पाहिलं आहे पूर्वीच्या काळात.