अयोध्या पौळ यांनी चष्म्यावर कमेंट केली, मुंडे समर्थक तुटून पडले
1128 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराहा व्हिडिओ सोशल मीडियावर आज चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर काही वेळानं शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी काही फेसबुक पोस्ट टाकल्या.मला आठवीलाच चष्मा लागला पण कुणालाच कौतुक नाही असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं. या पोस्टनंतर पंकजा मुंडे समर्थक चांगलेच संतापले आणि अयोध्या पौळ यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.मुंडे समर्थकांकडून अयोध्या पौळ यांचा हातात ग्लास असलेला एक फोटो शेअर करण्यात आला आणि त्यानंतर त्यांना काही मुंडे समर्थकांनी फोन आल्याचंही त्यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितलं.ताईचे समर्थक मला फोन करतायत मी तुमच्या ताईवर पोस्ट केली हे सिद्ध करुन दाखवा असं अयोध्या पौळ यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये म्हटलंय. पण एकंदरच या पोस्टमुळे अयोध्या पौळ यांना मुंडे समर्थकांच्या रोषाला सामोर जावं लागल्याचं पाहायला मिळतंय.