नाकात नथ,गळ्यात सोन्याचा दागिना, मंगळसूत्र, कपाळावर मोठं कुंकू; आईची हुबेहूब मूर्ती बनवली
1186 views
बीड चे व्हिडिओ सबस्क्राईब करादेशभरात अनेक मंदिरे आपण पाहिली असतील. मात्र कधी आईचे मंदिर पाहिले का? आईच्या मृत्यूनंतर बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाने आपल्या आईचं चक्क मंदिर बांधले आहे. हे मंदिर बांधल्यानंतर याची चर्चा पंचक्रोशीत झाली आणि अनेकजण हे मंदिर पाहण्यासाठी गर्दी करू लागले.तब्बल नऊ लक्ष रुपये खर्चून सावरगाव घाट इथे आपली दिवंगत आई राधाबाई शंकर खाडे यांचे अतिशय भव्य व देखणे असे मंदिर मुलाने उभारले आहे. या मंदिरात दिवंगत राधाबाई यांचे अत्यंत सजीव असे वाटणारे तब्बल पावणे तीन फूट उंचीचे शिल्प तयार करण्यात आले आहे. या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना केली जाणार आहे.