राजा कायम तणावात, राजकीय उलथापालथ,पिकांवर रोगराई; बहुप्रतिक्षित भेंडवळची भविष्यवाणी जाहीर
1151 views
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब करासंपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील 'भेंडवळची घटमांडणी'चे भाकीत जाहीर करण्यात आले आहे. घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरुन राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करत असतात. तसेच राजकीय घडामोडींबाबातही ऐकण्यास लोकं उत्सुक असतात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असतं. आज अखेर पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी ही भेंडवळची घटमांडणीचे अंदाज वर्तवण्यात आले आहे. राज्यात यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टी पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. तर हे अंदाज ऐकण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. नेमके अजून काय काय अंदाज यावर्षभराचे वर्तवण्यात आलेत जाणून घेऊयात.