खिचडीत अळ्या होत्या; वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं अन्न खायला दिल्यानं विद्यार्थिनींना विषबाधा
1171 views
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब कराचिखली येथील शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.त्यापैकी सहा मुलींची प्रकृती चिंताजनक आहे.या मुलींना मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत..चिखली येथील या शासकीय मुलींच्या वसतिगृहात गरीब कुटुंबातील ६२ मुली राहतात.या वसतीगृहातील मुलींना अतिशय निकृष्टदर्जाचे अन्न दिले जात असल्याचे समोर आलंय.या मुलींना कोणतीही सुविधा याठिकाणी मिळत नाहीत.मुलींना पिण्याचे शुद्ध पाणी नाही, भाजीपाला ही सडलेला असतो.या वसतीगृहासाठी राज्य सरकारचा समाज कल्याण विभाग लाखो रूपयांचा खर्च करते.मात्र तरीही मुलींना अळ्या पडलेले शिळे अन्न खायाला दिले जाते...याप्रकरणी वॉर्डनवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.या प्रकरणी सरकारनं कठोर पावले उचलणं अपेक्षित आहे.