दारु पिऊन ट्रॅक्टर चालवला, सुदैवानं अपघात टळले
1094 views
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात एक मद्यधुंद ट्रॅक्टर चालक रस्त्यावर नागरिकांच्या जीवाशी खेळ करताना पाहायला मिळाला. काळापाणी ते लमानदेवच्या दरम्यान एका कार चालकाने या ट्रॅक्टरचा हा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. समोरून येणाऱ्या वाहनांच्या अगदी समोर हा ट्रॅक्टर चालक आपले ट्रॅक्टर घालताना दिसून येत आहे. त्यामुळे बऱ्याचश्या वाहनांनी रस्त्याच्या खाली उतरून आपला जीव वाचवला खरा, मात्र अशा पद्धतीने बेधुंद ट्रॅक्टर चालवणाऱ्या या वाहन चालकावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस कुठ गेले ? असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय.. हा व्हिडिओ पोलिसांना पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र अजूनही पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे सिंदखेडराजा वाहतूक पोलीस झोपेचं सोंग घेऊन दुसऱ्याच मार्गाने अर्थाजनात मश्गुल असल्याचा आरोपही यावेळी होताना दिसतोय.