अनेक जिल्ह्यात हैदोस घालणाऱ्या बंटी-बबलीला अखेर अटक; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
1125 views
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा3 मोटरसायकल, 80 हजार रुपयांची सोनसाखळी असा 2 लाखांचा मुद्देमाल आणि याप्रमाणं अनेक जिल्ह्यात डल्ला मारणाऱ्या बंटी बबलीला अखेर जेरबंद करण्यात बुलढाणा पोलिसांना यश आलं आहे. गौरव मोटवानी व संगीता सुरडकर असं या आरोपींची नावं आहेत. विविध जिल्ह्यात जाऊन या दोघांनीही चोऱ्या केल्याची माहिती आहे. बुलढाणा शहरातून एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून हे बंटी बबली पळाले होते. एवढच नाही तर जळगावात या बंटी बबलीने मोटरसायकल चोरल्या असल्याची कबुली दिली. अखेर या पुढे कुठे चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या या बंटी बबलीचा प्लॅन फसला आणि बुलढाणा पोलिसांनी थेट धाड टाकत छत्रपती संभाजी नगर येथे असलेल्या या दोघांनीही बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस या घटनेची तपासणी करत असून आरोपींची कसून चोकशी करतायत.