संजय गायकवाड अग्निशमन दलाच्या गाडीत बसून घटनास्थळी पोहोचले अन् आग विझवण्यासाठी पुढाकार
1089 views
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबुलढाण्यातील प्रभाग क्रमांक ९ सोळंके लेआउट तुकाराम अंभोरे पाटील यांच्या घराजवळ गजानन बांबल यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली. आणि तेव्हा आमदार संजय गायकवाड एका लग्नावरून परत येत असताना त्यांना ही बाब त्यांच्या कानावर पडली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट नगरपालिकेत जाऊन अग्निशमन दलाची गाडी काढली .आणि त्यात बसून ते घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्याचा फवारा त्यांनी त्यांच्या हातात घेऊन भडकलेल्या आगीची परवा न करता प्रयत्नाची पराकाष्टा करत ती आटोक्यात आणण्यासाठी पुढाकार घेतला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेर यश आलं, कुटुंबावरचं संकटही टळलं पण एक जण गंभीर जखमी झाल्य़ानं दवाखान्यात दाखल करण्यात आलं. या प्रसंगादरम्यान अग्नी वीर म्हणून धावून गेलेले संजय गायकवाड यांच्यातील वेगळं स्वरूप यावे बघायला मिळालं. कुटुंबाची आपुलकीनं विचारपूसही केली.