मुख्यमंत्र्यांच्या नियोजित कार्यक्रमाला दोन तास उशीर; महिलांनी चिमुकल्यांसाठी मंडपातच बांधले पाळणे
1082 views
बुलढाणा चे व्हिडिओ सबस्क्राईब करानियोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना उशीर झाला पण मंडपात उपस्थितांचे उन्हामुळे मात्र चांगलेच हाल झाले. बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील इसरुळ येथील संत चोखोबाराया यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडला. मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित कार्यक्रम दुपारी १२ वाजता ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांना पोहोचायला तब्बल दोन तास उशीर झाला . तोपर्यंत उपस्थितांचे मात्र चांगलेच हाल झाले, महिलांसोबत त्यांचे लहान मुलंही होती. उन्हाचा त्रास सोसवत नव्हता त्यामुळे लेकरांचे हाल होत होते. अखेर महिलांनी त्या मंडपातच लेकरांसाठी पाळणे बांधले. तर काही वृद्ध महिलांना ऊन्हाचा त्रास होत असल्यानं त्या मंडपातच आडव्या पडल्या. मुख्यमंत्र्यांना पाहायला भेटण्याकरता आलेले सगळेच अगदी भर उन्हात दोन तास ताटकळत बसले होते. सगळ्यांचीच उन्हामुळे घालमेल होत असल्याचं चित्र या मंडपात दिसून येत आहे.