समृद्धी महामार्गावार भीषण अपघात, सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला
1617 views
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करासैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला घातल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून यामधे चार महिन्याच्या बालकाचा देखील समावेश असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. तर वीस जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वैजापूर आणि छ. संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. यातील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.