संभाजीनगरच्या जागेचा तिढा सुटेना, भागवत कराड म्हणाले, या जागेवर शिवसेनेचा अधिकार राहिलेला नाही
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून रस्सीखेच सुरू आहे.लोकसभेचं तिकीट मिळवण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी फडणवीसांची भेट घेतली.ते म्हणाले, मी गेल्या पाच वर्षापासून काम करत आहे. आणि त्यामुळे मी लोकसभेसाठी इच्छुक आहे.ते म्हणाले, ही जागा आधी शिवसेनेची होती, मात्र शिवसेनेचा उमेदवार गेल्या वेळी पडला होता.एवढेच नाही तर जो पडलेला उमेदवार होता ते चंद्रकांत खैरे एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाहीत.यामुळे आम्हाला असं वाटतं की या जागेवर शिवसेनेचा अधिकार राहिलेला नाही.शिवसेनेच्या तुलनेत भाजपने इथे खूप चांगलं काम केलं आहे.मात्र वरिष्ठांना जो निर्णय योग्य वाटेल त्यावर आम्ही काम करू, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसलाही दुजाभाव नाही.चंद्रकांत खैरे- अंबादास दानवे यांचा वाद मिटेल की नाही हे सांगता येत नाही.असंही यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी स्पष्ट केलं आहे.