छ. संभाजीनगर आणि धाराशिवचं नामकरण, पण जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा विसर?; ठाकरे गट आक्रमक
छ. संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरणाच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्याचा विसर पडला काय?...असा संतप्त सवाल कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारला केला आहे.बाळासाहेब ठाकरेंनी शहरांचं नाव ठेवण्याची संकल्पना मांडली आणि याला महाविकास आघाडी काळात उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली...तब्बल दीड वर्षानंतर शिंदे सरकारने कार्यक्रम घेत या निर्णयाचं श्रेय घेत जाहिरातबाजी केली, पण बाळासाहेबांचा...तुम्हाला विसर पडला, असं जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले.
Curated by Komal Acharekar|TimesXP Maharashtra|17 Sept 2023