संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, 'भानुदास एकनाथ' अशा जयघोषाने पैठणनगरी दुमदुमली!
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
भक्तिमय वातावरणात नाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. आषाढीच्या पंढरपूर वारीसाठी गेल्या ४२५ वर्षांपासून हजारो वारकरी नाथांच्या पैठण नगरीत जमा होतात. टाळ मृदंगाच्या गजरात आनंदाने 'भानुदास एकनाथ' असा जयघोष करीत पालखी प्रस्थान झाले.