मी नाराज नाही, द बॉस इज ऑल्वेझ राइट; शिंदेंच्या भेटीनंतर विनोद पाटलांची पहिली प्रतिक्रिया!
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या विजयाचे गणित माझ्याकडे आहे.असं म्हणत विनोद पाटील यांनी या लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली होती.मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा एक दिवस आधी त्यांनी माघार घेतली आहे.या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...यांनी विनोद पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी देखील....त्यांनी महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही.त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद पाटील यांच्या घरी घेतलेले भेट महत्त्वाची मानली जात आहे.या माध्यमातून या मतदारसंघांमध्ये भुमरे यांच्या विजयाचे गणित जुळवण्याचा...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.तब्बल ४० मिनिटांच्या भेटीत काय झालं? या संदर्भात बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी सुशील राऊत यांनी...