सिग्नल तोडणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून भर चौकात मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद
1065 views
छत्रपती संभाजीनगर चे व्हिडिओ सबस्क्राईब करावाहतुकीचे सिग्नल तोडल्यामुळे एका ट्राफिक पोलिसांनी एका तरुणाला निर्दयीपणे मारहाण केल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही संपूर्ण घटना छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकामध्ये घडली.वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या ठिकाणी उभे असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करत असतात. मात्र छत्रपती संभाजी नगर शहरातील क्रांती चौकामध्ये असलेल्या सिग्नल वर एका दुचाकी स्वार तरुणाने सिग्नल तोडल्यामुळे एका वाहतूक पोलिसांनी त्याला अडवलं दरम्यान त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला आणि यामुळे एका वाहतूक पोलिसांनी तरुणाला थेट लाथा बुक्क्यांनी मारहाण केली भर चौकामध्ये सुरू असलेला हा प्रकार एका नागरिकांनी स्वतःच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला. दरम्यान हा व्हिडिओ सध्या माध्यमांवरती प्रचंड व्हायरल होतं वाहतूक पोलिसांनी सिग्नल तोडणाऱ्या तरुणावरती दंडात्मक कारवाई करावी असे मारू नये अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.