पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या, गावकऱ्यांनी हलगी वाजवून गावात मिरवणूक काढली
1173 views
धाराशिव चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकळंब शहरातील नागरिकांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करुन शहरात हलगी वाजवत मिरवणूक काढली, या कौतुक सोहळयाची चर्चा धाराशिव जिल्हयात होत आहे.३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री गांधी चौकातील कात्रे काँम्पलेक्समधील SBI बँकेचे ATM मशीन २९ लाख ९५ हजार ५०० रुपये सह उचलून नेले होते. एक प्रकारे चोरांनी पोलीसांना आव्हानच दिले होते.पोलीसानी तपासाची चक्र जलद गतीने फिरवत सेलु येथून २ आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तसंच ATM मशीन वाहतुक करणारे पिकअप वाहन जप्त केले. उर्वरित ३ आरोपीच्या मागावर पोलीस असून लवकरच त्यांना ही जेरबंद करुन अशी खात्री पोलीसांनी दिली आहे. कुठला हि पुरावा चोरांनी ठेवला नव्हता फक्त रस्त्यावरील CCTV कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीना पकडण्यात पोलीसांना यश आलय. पोलीसांचा कौतुक व्हावे म्हणुन कळंबकरांनी सत्कार करुन जंगी मिरवणुकच काढली आहे.