धाराशिवमध्ये तुम्ही काय केलं याचे पुरावे द्या, राणा जगजीतसिंह पाटलांचा ओमराजेंवर निशाणा
1025 views
धाराशिव चे व्हिडिओ सबस्क्राईब कराधाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी अर्चना पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे प्रतिस्पर्धी असणार आहेत.भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांनी वेगवेगळ्या विषयावंर मटासोबत संवाद साधला.यावेळी बोलताना त्यांनी मविआ उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.ते म्हणाले, तेरणा ट्रस्टने लाखो लोकांवर उपचार केले हेच विरोधकांना पाहून त्यांच्या पोटात दुखतंय.ओमराजेंनी तेरणा ट्रस्ट बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर राणा जगदीतसिंह पाटील बोलत होते.ही निवडणूक देशाची आहे, लोकसभेची आहे, विकासावर प्रचार व्हायला पाहिजे.विकासावर चर्चा व्हायला पाहिजे, आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी काय केलं आहे?३० एप्रिल रोजी धाराशिव येथे होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.आमदार राणा जगदीतसिंह पाटील यांच्याशी चर्चा केलीये प्रतिनिधी रहीम शेख यांनी....